मोठी ब्रेकिंग | पालकमंत्री पदाची यादी जाहीर; तीन जिल्ह्यासाठी सह-पालकमंत्री पदाची निर्मिती

  खास प्रतिनिधी – मंत्रालय टाइम्स  राज्यात गेल्या काही दिवसापासून पालकमंत्री पदाच्या चर्चांला उधाण आले. त्यात दि. १८ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीतील माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गडचिरोलीचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. त्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. ते पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. … Read more

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रस्ताव ‘महसूल’मध्ये धुळखात.! ५ दिवसांचा आठवडा अन्‌ १० जिल्ह्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीसाठी एक अध्यक्ष

  सोलापूर (खास प्रतिनिधी ) – मंत्रालय टाइम्स | राज्यातील जात पडताळणी समित्यांकडे जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी (कास्ट व्हॅलिडिटी) दरमहा पाच हजारांहून अधिक अर्ज येतात. त्यात राजकीय, सरकारी नोकरदार, व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी आहेत. त्यांना किमान १५ ते ४० दिवसांत व्हॅलिडिटी प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे, पण सध्या राज्यातील ३६ समित्यांसाठी अवघे चार अध्यक्ष असल्याने प्रमाणपत्रासाठी विलंब … Read more

गुवाहटीफेम माजी आमदार शहाजी बापू पाटलांची फॉर्च्युनर फोडली, सांगोल्यात शिवसैनिक संतप्त

  राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी संपली असून नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळाही पार पडला. त्यामुळे, गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोप आणि राजकीय खुन्नस दर्शवणाऱ्या घटना आता मावळल्या आहेत. मात्र, त्यातही सांगोला मतदारसंघात माजी आमदाराच्या कार्यालयासमोर लावण्यात आलेल्या फॉर्च्युनर कारवर दगडफेक करण्यात आल्याची घटना घडल्याने शहरात तणाव निर्माण झाला आहे. काय झाडी, डोंगार, काय हाटील फेम माजी … Read more

मोठी बातमी! १३ ऑक्टोबरपासून राज्यात आचारसंहिता? महायुती सरकारची आज शेवटची ‘कॅबिनेट’; निवडणुकीचा ‘असा’ असणार ४४ दिवसांचा प्रोग्राम, वाचा सविस्तर

मंत्रालय टाइम्स – मुंबई प्रतिनिधी | विधानसभेची निवडणूक वेळेत होवून २६ नोव्हेंबरपर्यंत नवीन सरकार स्थापन होण्याकरिता १३ ऑक्टोबरपासून आचारसंहिता अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर आज (ता. ८) कॅबिनेट बोलावण्यात आली असून महायुती सरकारची चालू कार्यकाळातील ही शेवटची कॅबिनेट ठरू शकते, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातील (सीएमओ) विश्वसनिय सूत्रांनी माहिती दिली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी (ता. ७) सोलापूर … Read more

महायुतीत मिठाचा खडा..? तानाजी सावंत जे बोलले ते ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडलेले बरे, अजित पवार गटाचा इशारा..!

मंत्रालय टाइम्स – सोलापूर | “राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही, मांडीला मांडी लावून बसलोय पण बाहेर आल्यावर उलट्या होतात”, वक्तव्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं. दरम्यान, तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांची राष्ट्रवादी (Ajit Pawar NCP) आक्रमक झाली आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून थेट सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा देण्यात आलाय. तानाजी सावंताच्या … Read more

ब्रेकिंग | राज्यातील ७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कुणाची बदली कुठे?

मंत्रालय टाइम्स – मुंबई | राज्यात काही दिवसांपूर्वी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. यानंतर राज्यात अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या मनीषा आव्हाळे यांच्या पुण्यात बदली करण्यात आली. त्यांच्या गुणवत्तेची दखल घेऊन त्यांना पदभारासह बदली करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे ते लवकरच पुण्यतील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या … Read more

WhatsApp Icon Telegram Icon