ब्रेकिंग | राज्यातील ७ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या, पाहा कुणाची बदली कुठे?
मंत्रालय टाइम्स – मुंबई | राज्यात काही दिवसांपूर्वी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या होत्या. यानंतर राज्यात अनेक आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये सोलापूर जिल्हा परिषदेच्या मनीषा आव्हाळे यांच्या पुण्यात बदली करण्यात आली. त्यांच्या गुणवत्तेची दखल घेऊन त्यांना पदभारासह बदली करण्याबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून पत्र प्राप्त झाले आहे. त्यामुळे ते लवकरच पुण्यतील स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचा पदभार स्वीकारणार आहेत. दरम्यान, अभिनव गोयल, विनायक महामुनी, सतीशकुमार खडके, सौम्या चांडक, कुलदीप जंगम आणि प्रदीपकुमार डांगे यांचीही बदली करण्यात आली आहे.
शासनाने बदली केली असून आपली नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, पुणे या रिक्त पदावर करण्यात आली. त्यांच्या जागी कुलदीप जंगम, भाप्रसे IAS यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार जंगम, भाप्रसे यांच्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा, असे पत्र सामान्य प्रशासन विभागाच्य मुख्य सचिव व्ही. राधा यांनी मनीषा आव्हाळे यांना पाठवले आहे.
अभिनव गोयल यांची हिंगोली जिल्हा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे पुण्यातील स्मार्ट सिटीची मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी या अधिकाऱ्यांच्या बदलीमुळे त्यांची प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.