मोठी ब्रेकिंग | पालकमंत्री पदाची यादी जाहीर; तीन जिल्ह्यासाठी सह-पालकमंत्री पदाची निर्मिती

  खास प्रतिनिधी – मंत्रालय टाइम्स  राज्यात गेल्या काही दिवसापासून पालकमंत्री पदाच्या चर्चांला उधाण आले. त्यात दि. १८ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीतील माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गडचिरोलीचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. त्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. ते पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. … Read more

धनंजय मुंडेंची शिफारस वादात, वाल्मिक कराड ‘लाडकी बहीण’चा अध्यक्ष

  केजमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात दररोज नवनवीन माहिती उघड होत आहे. या प्रकरणाशी कथित संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात वाल्मिक कराड याच्याबद्दल दररोज नवे खुलासे होत आहेत. वाल्मिक कराड हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या परळी मतदारसंघाच्या समिती अध्यक्षपदी असल्याची माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर तो परळी समितीच्या पदावर अजूनही कायम … Read more

ब्रेकिंग | महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ : एसपींच्या कार्यालयात आढळला पोलिसाचा मृतदेह..!

  खास प्रतिनिधी | मागील काही दिवसांपासून बीड जिल्हा महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आहे. ९ डिसेंबर रोजी इथे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली. यानंतर बीडमध्ये एकापाठोपाठ एक गुन्हे घडताना दिसत आहेत. संतोष देशमुख प्रकरणी पोलिसांनी कुचराई केल्यामुळे बीड पोलीस प्रशासनही चांगलंच चर्चेत आहे. येथील काही पोलिसांचे थेट मुख्य आरोपी … Read more

मोठी बातमी! बीडमध्ये CID ने डॉक्टरला उचललं..!

खास प्रतिनिधी  सरपंच संतोष देशमुख (Santosh deshmukh) हत्याप्रकरणातील प्रमुख तीन फरार आरोपींना अटक करण्यासाठी सीआयडी पोलिसांनी चक्रे फिरवली आहे. त्यानुसार, गुरुवारी तिन्ही आरोपींचे फोटोसह परिपत्रक जारी करत आरोपींची माहिती देणाऱ्यांना योग्य ते बक्षीस दिलं जाईल,असेही जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे, सरपंच हत्याप्रकरणात एसआयटी नेमण्यात आल्यानंतर सीआयडी (CID) पथकाकडून तपासाला वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच, … Read more

वाल्मिक कराडने गडचिरोलीतून बदली करुन आणलेला पोलीस कर्मचारी एसआयटीत; खुनातील घुलेही त्याच्या जवळचा..?

  खास प्रतिनिधी – मंत्रालय टाइम्स संतोष देशमुख खून प्रकरणात तपास करणाऱ्या विशेष पथकातील काही पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांबद्दल देशमुख कुटूंबियांना शंका आहे. त्यामुळे या मंडळींना तपास प्रक्रियेपासून दूर ठेवण्याची मागणी आपण मुख्यमंत्र्याकडे केली आहे.वाल्मिक कराडने गडचिरोली येथून बदली करुन आणलेला एक पोलिस कर्मचारीही यात आहे. काही लोक त्याच्या अतिसंपर्कात आहेत. तत्कालीन पालकमंत्र्यांनी आपले पद भाड्याने … Read more

ब्रेकिंग | ‘या’ प्रकरणी पोलीस अधीक्षकांची बदली, फडणवीसांची घोषणा

  बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात असलेल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची 09 डिसेंबरला अत्यंत निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे बीडमध्ये गुंडाराज पुन्हा एकदा डोके वर काढू पाहात असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनातही उमटल्याचे पाहायला मिळाले. विरोधकांनी बीड हत्या प्रकरण आणि परभणीच्या घटनेवरून 101 अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला … Read more

WhatsApp Icon Telegram Icon