मोठी बातमी | अख्खे पोलीस ठाणे निलंबित. जप्त केलेली दीड कोटींची रोकड घेतली वाटून, अन्.

नागपूर प्रतिनिधी | गोपनीय खबऱ्या मध्य रात्री नाकाबंदीदरम्यान कारमध्ये सापडलेल्या तीन कोटी रुपयांची रोख रक्कम पाहून डोळे पांढरे झालेल्या मध्य प्रदेश पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी अपहार करत दीड कोटींची रोख रक्कम आपसांत वाटून घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने मध्य प्रदेश पोलीस दलातील भ्रष्टाचाराची लक्तरे चव्हाट्यावर आल्याने खळबळ उडाली आहे. मराठवाड्यातील जालना येथील एक व्यापारी मोठ्या … Read more

कनिष्ठ अभियंत्याचे राजीनामापत्र! ‘साहेबा’च्या घरात किराणा भरा, विमानाची तिकिटे काढा!

  मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा धरणाच्या निर्मितीत मोलाचे योगदान देणाऱ्या तत्कालीन मुख्य अभियंत्यांचे नाव कोनशिलेवर कोरलेले आहे. याची आठवण होण्याचे कारण ठरले आहे ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे धाराशिव येथील कनिष्ठ अभियंता रोहन कांबळे यांचे राजीनामापत्र! खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पदाचा राजीनामा देताना ‘आपण अभियंता असतानाही आपल्याला मूळ जबाबदारी पार पाडली जाऊ देत नाही’ ही खंत … Read more

मुस्लिम व्यक्ती सनातनी हिंदू बनल्यास प्रति महिना ३००० रुपये देणार; शिया वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षांची महाकुंभात घोषणा

  धर्म परिवर्तन करून वसीम रिझवीचे जितेंद्र नारायण त्यागी बनलेले शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्षांनी आता मुस्लिमांना घरवापसी करण्याचे खुले आवाहन केले आहे. इतकंच नाही तर सनातन धर्म स्वीकारणाऱ्या मुस्लिमांना दरमहा तीन हजार रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. मंगळवारी त्यांनी महाकुंभात पोहोचून संगमस्नान केले. इस्लाम धर्मातून सनातन धर्म स्वीकारणाऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये दिले … Read more

दलाली करणाऱ्यांना मंत्रालयात नेमणार नाही, सेनेच्या नाराज मंत्र्यांच्या खदखदीवर फडणवीसांचे उत्तर

  मुंबई : पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून सुरू असलेली धुसफूस आता मंत्र्यांच्या ओएसडी आणि पीएस नियुक्तीपर्यंत पोहोचल्याचं दिसत आहे. ओएसडी आणि पीएसच्या नेमणुका का होत नाही असा प्रश्न शिवसेनेच्या नाराज मंत्र्यांनी विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी सडेतोड उत्तर दिलं. अनेक वर्षांपासून सातत्याने ओएसडी आणि पीए म्हणून काम करणाऱ्यांचे संबंध दलालांशी आहेत. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची शिफारस जरी केली तरी त्यांची … Read more

मोठी ब्रेकिंग | पालकमंत्री पदाची यादी जाहीर; तीन जिल्ह्यासाठी सह-पालकमंत्री पदाची निर्मिती

  खास प्रतिनिधी – मंत्रालय टाइम्स  राज्यात गेल्या काही दिवसापासून पालकमंत्री पदाच्या चर्चांला उधाण आले. त्यात दि. १८ जानेवारी रोजी पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादीतील माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना गडचिरोलीचे पालकमंत्री पद देण्यात आले आहे. त्याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दोन जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले आहे. ते पुणे आणि बीडचे पालकमंत्री असणार आहेत. … Read more

महसूलच्या बदल्यांसाठी मंत्रालयात चकरा माराव्या लागणार नाहीत – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे.

  बदल्यांसाठी नायब तहसीलदार, तहसीलदार, उपविभागीय अधिकाऱ्यांना यापुढे मंत्रालयात चकरा माराव्या लागणार नाहीत. सर्व बदल्या नियमांनुसार व पारदर्शक पद्धतीने होतील. बदल्यांमधील भ्रष्टाचारावर अंकुश लावला जाईल, अशी ग्वाही महसूलमंत्री तथा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. बावनकुळे म्हणाले, अधिकाऱ्यांच्या बदल्या, रेतीलिलाव आणि दस्तनोंदणी या तीन प्रमुख मुद्द्यांवर आपण प्राधान्याने काम करणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या … Read more

मोठी बातमी | बुलढाणा पोलिसांचा ‘बुरखा’ आ. संजय गायकवाड यांनी विधानसभेत ‘टराटरा’ फाडला!

  अवैध धंदे, गांजातस्करी, चोर्‍यांना उधाण! – तरूणही नशेत बेधुंद असल्याने गुन्हेगारीही बोकाळली; वरलीमटक्याचे अड्डे पोलिसांच्या डोळ्यासमोर सुरू! नागपूर (खास प्रतिनिधी ) – बुलढाणा जिल्ह्यात सहा महिन्यात तीन जातीय दंगली झाल्या असून, चोर्‍यांचे प्रमाणदेखील वाढले आहे. तर अवैध धंदे मोठ्या प्रमाणात बोकाळले असून, गांजातस्करीही वाढली आहे, यामुळे युवक नशेत बेधुंद होत असल्याने गुन्हेगारी वाढल्याचे दिसत … Read more

सर्वात मोठी बातमी! सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी; नागपूर विमानतळावर धक्कादायक घटना

  शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासोबत नागपूर विमानतळावर धक्कादायक प्रकार घडला आहे. एक अज्ञात व्यक्ती सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी देत विमानतळावर तसंच ‘जय श्रीराम’च्या घोषणाही देत निघून गेला. या घटनेचा खुलासा सुषमा अंधारेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत केला आहे. सुषमा अंधारे नागपूर विमानतळावरून मुंबईसाठी जात होत्या, तेव्हा एक 6 फूट उंच व्यक्ती … Read more

ब्रेकिंग | महायुतीच्या सर्व आमदारांना संघ कार्यालयातून निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष

खास प्रतिनिधी  महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) काल (15 डिसेंबर) नागपूरच्या राजभवन येथे पार पडला. यात महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामध्ये, 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर (Maharashtra Cabinet Expansion) भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक … Read more

मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली नावांची यादी गेली दिल्लीकडे ; उद्या नागपुरात पार पडणार शपथविधी सोहळा

मंत्रालय टाइम्स (खास प्रतिनिधी ) महायुतीच्या मंत्रिमंडळाचा उद्या नागपूरमध्ये विस्तार होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार शपथ घेतल्यानंतर दहा दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. दरम्यान, 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. उद्या दुपारी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे नवीन मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देतील. अशातच … Read more

WhatsApp Icon Telegram Icon