मुस्लिम व्यक्ती सनातनी हिंदू बनल्यास प्रति महिना ३००० रुपये देणार; शिया वक्फ बोर्डाच्या माजी अध्यक्षांची महाकुंभात घोषणा

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

 

धर्म परिवर्तन करून वसीम रिझवीचे जितेंद्र नारायण त्यागी बनलेले शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्षांनी आता मुस्लिमांना घरवापसी करण्याचे खुले आवाहन केले आहे. इतकंच नाही तर सनातन धर्म स्वीकारणाऱ्या मुस्लिमांना दरमहा तीन हजार रुपये देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे.

मंगळवारी त्यांनी महाकुंभात पोहोचून संगमस्नान केले. इस्लाम धर्मातून सनातन धर्म स्वीकारणाऱ्यांना दरमहा तीन हजार रुपये दिले जातील आणि त्यांना व्यवसाय करण्यासाठी ही मदत केली जाईल, असे ते म्हणाले.

जितेंद्र नारायण त्यागी यांनी सांगितले की, आज संगम स्नान केल्यानंतर त्यांना खूप आनंद होत आहे. मी या पवित्र भूमीवरील देशभरातील मुस्लिमांना विनंती करतो की, त्यांनी सनातन धर्मात परतण्याच्या संदर्भात विचार करावा. मी माझ्या मित्रांच्या माध्यमातून एक संस्था तयार करत आहे, आमच्या संस्थेच्या माध्यमातून सनातन धर्मात परतलेल्या मुस्लिम कुटुंबांना दरमहा तीन हजार रुपये देण्यात येतील. सनातन धर्मात पूर्णपणे स्थायिक होईपर्यंत ते तीन हजार रुपये देतील. ज्यांना व्यवसाय करायचा आहे त्यांनाही व्यवसायात मदत केली जाईल.

त्यांनी म्हटले की, मूलतत्त्ववादी आणि जिहादी मानसिकतेतून तुम्हाला बाहेर पडावे लागेल. आपल्या आनंदाने सनातन धर्माकडे परत या. सनातन धर्म तुमचे स्वागत करतो. उत्तर प्रदेश शिया वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी तीन वर्षांपूर्वी इस्लाम धर्म सोडून सनातन धर्म स्वीकारला होता. धर्म बदलल्यानंतर त्यांनी आपले नावही वसीम रिझवी वरून जितेंद्र नारायण सिंह त्यागी असे बदलले. जुना आखाड्याचे महामंडलेश्वर नरसिंहानंद गिरी यांनी त्यांचे सनातन धर्मात धर्मांतर करून त्यांना नवे नाव दिले होते.

धर्मांतर केल्यानंतर रिझवी यांनी सनातन धर्म जगातील सर्वात जुना धर्म असल्याचे सांगितले. वसीम रिझवी यांनी सनातन धर्म स्वीकारल्यानंतर त्यांची शुद्धी करण्यात आली होती. हवन-यज्ञही करण्यात आला होता.

डॉ. संकेतराज बने मुख्य संपादक  के बारे में
For Feedback - mantralaytimes@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

error: Content is protected !!
WhatsApp Icon Telegram Icon