ब्रेकिंग | महायुतीच्या सर्व आमदारांना संघ कार्यालयातून निमंत्रण; अजित पवारांच्या भूमिकेकडे साऱ्यांचे लक्ष
- खास प्रतिनिधी
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला मिळालेल्या लँडस्लाईड यशानंतर महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार (Maharashtra Cabinet Expansion) काल (15 डिसेंबर) नागपूरच्या राजभवन येथे पार पडला.
यात महायुतीच्या 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामध्ये, 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. मात्र, राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर (Maharashtra Cabinet Expansion) भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी मंत्रिपद न मिळाल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे.
अशातच नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगाने महायुतीचे सर्व आमदार नागपुरात उपस्थित आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीच्या सर्व आमदारांना नागपुरातील राष्ट्रीय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयाच्या वतीने निमंत्रण देण्यात आले आहे. येत्या 19 तारखेला सकाळी 8 वाजता संघ कार्यालयात उपस्थित राहण्याचे विशेष निमंत्रण संघाच्या कार्यालयाकडून देण्यात आले आहे. तर महायुतीचे सर्व आमदार यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहितीही सूत्रांकडून मिळते आहे. मात्र या निमंत्रणाला अजित पवार आणि त्यांचे आमदार उपस्थित राहणार का? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
- संघ कार्यालयाच्या परिसरात जाऊनही अजित दादांनी समाधीचे दर्शन घेणे टाळले!
नागपूरच्या रेशिमबाग मैदानावर राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहिण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राज्याचे तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरेंसह महायुतीतील इतर प्रमुख नेत्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमात नागपूरसह विदर्भातून हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित झाल्या असून पेंडोलमध्ये बसायला जागा देखील शिल्लक नसल्याचे बघायला मिळाले आहे. त्यामुळे शेजारचे सुरेश भट सभागृहात ही महिलांच्या बसण्याची व्यवस्था करावी लागली होती.
दरम्यान, हा कार्यक्रम आटोपल्यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी संघ कार्यालयात हजेरी लावली होती. मात्र अजित दादांनी संघ कार्यालयाच्या परिसरात जाऊनही अजित दादांनी आद्य सरसंघचालक डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेणे टाळले होते. त्यामुळे आता अजित पवार काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.