गणपती बाप्पा मोरया! राज्यभरात लाडक्या गणपती बाप्पाचं ढोल ताशांच्या गजरात आगमन

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

संपूर्ण देशभरात आजपासून गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भासह राज्यातील इतर सर्वच भागात बाप्पाचं आगमन झालेलं आहे. लाडक्या गणरायाचं ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि बाप्पा मोरया जयघोषात घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. राज्यभरात लाडक्या गणपती बाप्पाचं उत्साहात स्वागत करण्यात आलं. मुंबईमधील बाप्पाच्या स्वागतासाठी भाविकांची लगबग पाहायला मिळत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांनी सकाळपासून गर्दी केल्याचं दिसून येत आहे. दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे सध्या मुंबई दौऱ्यावर असून आज ते लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे हे देखील आजच लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. दरम्यान, यासह राज्यातील सर्व राजकीय घडामोडी व महाराष्ट्रातील गणेशोत्सवाचे सर्व अपडेट्स आपण लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

🛑 राज ठाकरे यांच्या घरीही लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन

मुंबई, ठाणे, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भासह राज्यातील इतर सर्वच भागात बाप्पाचं आगमन झालेलं आहे. लाडक्या गणरायाचं ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि बाप्पा मोरया जयघोषात घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरीही लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.

🛑 पुण्यातील दगडूशेठ गणपतीसमोर ३० हजार महिला करतात अथर्वशीर्ष पठण; ४० वर्षांची अनोखी परंपरा

🛑 केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज लालबागच्या राजाचं दर्शन घेणार

राज्यातील इतर सर्वच भागात बाप्पाचं आगमन झालेलं आहे. मुंबईमधील बाप्पाच्या स्वागतासाठी भाविकांची लगबग पाहायला मिळत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांनी सकाळपासून गर्दी केल्याचं दिसून येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे हे देखील आजच लालबागच्या राजाचं दर्शन घेणार आहेत.

🛑 “आगमनाचा सोहळा…भक्तीचा उत्सव…, एकच विजयी जयघोष गणपती बाप्पा मोरया!”, फडणवीसांनी शेअर केली पोस्ट

मुंबई, ठाणे, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भासह राज्यातील इतर सर्वच भागात बाप्पाचं आगमन झालेलं आहे. लाडक्या गणरायाचं ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि बाप्पा मोरया जयघोषात घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी भाविकांची लगबग पाहायला मिळत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट शेअर करत गणपती बाप्पा मोरया म्हणत प्रतिक्रिया दिली आहे. “आगमनाचा सोहळा… भक्तीचा उत्सव… आणि हृदयात व मनात, एकच विजयी जयघोष गणपती बाप्पा मोरया!”, अशी पोस्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेअर केली आहे.

https://x.com/Dev_Fadnavis/status/2099341720999821805

आगमनाचा सोहळा… भक्तीचा उत्सव…
आणि मनामनात एकच जयघोष
गणपती बाप्पा मोरया!

🛑 बाप्पा मोरया! राज्यभरात लाडक्या गणपती बाप्पाचं ढोल ताशांच्या गजरात आगमन

संपूर्ण देशभरात आजपासून गणेशोत्सवाला सुरूवात झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, कोकण, मराठवाडा, विदर्भासह राज्यातील इतर सर्वच भागात बाप्पाचं आगमन झालेलं आहे. लाडक्या गणरायाचं ढोल ताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि बाप्पा मोरया जयघोषात घरोघरी गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. मुंबईमधील बाप्पाच्या स्वागतासाठी भाविकांची लगबग पाहायला मिळत आहे. लालबागच्या राजाच्या दर्शनाला भाविकांनी सकाळपासून गर्दी केल्याचं दिसून येत आहे.

आमच्याबद्दल माहिती
मंत्रालय टाईम्स हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींवर लक्ष केंद्रित करणारे एक डिजिटल न्यूज पोर्टल (वेब पोर्टल) आहे. स्वतःला भारताची पहिली विश्वसनीय माहिती देणारी राजकीय वृत्तसंस्था म्हणून ओळखणारे हे पोर्टल सुशासनाला (Good Governance) पाठिंबा देण्यासाठी आणि राजकीय उत्तरदायित्व वाढवण्यासाठी कार्यरत आहे. Read More
For Feedback - mantralaytimes5005@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

error: Content is protected !!
WhatsApp Icon Telegram Icon