“मी उद्या मुंबईला निघणार, मेलो तरी हटणार नाही. आजच निघणार होतो पण नारायणगडाच्या महंतांनी केलेल्या विनंतीला मान देऊन सलाईन लावले. पण, उद्या मी एक वाजता १०० टक्के मुंबईला जाणार म्हणजे जाणार, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले. जरांगे पाटलांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून त्यांनी मुंबईत जाण्यावर ठाम असल्याचे सांगितले. दरम्यान, यावेळी त्यांनी आंदोलकांना सध्या तरी माघारी जाण्याचे आवाहन केले. “मला जाण्यास अडवल्यास बोलवून घेतो”, असेही जरांगे पाटील म्हणाले.
“मला उठता, बसता नाही येत, हाता-पायात प्रचंड आग होतेय. मी आज जाणार होतो पण, जाता आले नाही. पण, उद्या मी एक वाजता १०० टक्के मुंबईला जाणार म्हणजे जाणार. मराठ्यांनी मुंबईत कधी यायचे याची तारीख देखील आजच जाहीर करणार होतो पण, सरकारने ड्राफ्ट केलाय असं कळतंय ते पाहून मी त्याचीही घोषणा करणार”, असे जरांगे पाटील म्हणाले. “१८ तारखेला आझाद मैदानावर जाण्यास कोण अडवतंय आणि नंतर मराठ्यांना बोलवतो”, असे पाटील पुढे म्हणाले. पाटील यांनी यानंतर पुढला मुक्काम न करता थेट मुंबईत दाखल होणार असल्याचे सांगितले.

तर सरकार पडू शकतं – जरांगे पाटील
“पश्चिम महाराष्ट्रात नेहमीच अपमान केला जातो, त्यांना आरक्षणाची गरज नाही असं सांगितले जाते. पण, पश्चिम महाराष्ट्रात लोक संतापले आहेत”, असे जरांगे पाटील म्हणाले. तसेच, पाटलांनी मराठा आंदोलकांनी रस्त्यावर थांबण्याची आणि गाड्या उभ्या न करण्याचे आवाहन केले आहे. माझं मुंबईत वेळेत पोहोचणे आवश्यक आहे. मला जर अडवलं तर मी तुम्हाला बोलवून घेतो, असे पाटलांनी आंदोलकांना आवाहन केले.”सरकार आणि मराठा समाज यांच्या धुसफूस सुरु आहे, किती भायण चित्र निर्माण होऊ शकतं. लाठीचार्ज वैगेरे झाला तर सरकार पडू शकतं”, असे जरांगे पाटील पोलिसांनी आंदोलनाबाबत मागितलेल्या तपशीलावरुन बोलताना म्हणाले.
आंदोलकांना मुंबईत न येण्याचे आवाहन
जरांगे पाटील यांनी यावेळी आंदोलकांना मुंबईत न येण्याचे तसेच रस्त्यात न थांबण्याचे आवाहन केले. हार किंवा फुलं नको असेही पाटील म्हणाले. शिवराळ भाषेबद्दल विचारले असता जरांगे पाटील यापूर्वी चांगले बोलत होते त्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा नाही का झाली? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “१३ पैकी १२ मागण्या मान्य झाल्या सांगतात पण, हैदराबाद गॅझेटचं प्रमाणपत्र वाटप नाही, वैधता देत नाही. हैदराबादचा जीआर सुधारीत करुन द्या”, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली.



