दमदार आवाज, मनाचा ठाव घेणारा अभिनय आणि सामाजिक बांधिलकी जपणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन झाले. गोव्यामध्ये ह्दयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त आहे. ते ७५ वर्षांचे होते.
नाना पाटेकर यांनी नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत केली. त्याशिवाय याच संस्थेच्या माध्यमातून जलसंधारणाची कामे केली.
नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी रंगभूमी ते बॉलिवूड अशी मुशाफिरी करणारा दमदार अभिनेता हरपल्याची भावना व्यक्त व्यक्त केली जात आहे. नाना पाटेकर यांच्या निधनाने रंगभूमी, सिनेसृष्टीवरच नव्हे तर समाजमनावरही शोककळा पसरली आहे.




