मोठी ब्रेकिंग ! मुंबई-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, त्र्यंबकेश्वरहून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, ४ जागीच ठार

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

मुंबई-नाशिक महामार्गावर शहापूरजवळील आटगावच्या हद्दीत कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की ४ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर ६ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. नाशिक येथील त्र्यंबकेश्वरचे दर्शन घेऊन मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या भाविकांच्या कारने महामार्गावर कडेला उभ्या असलेल्या एका मालवाहू वाहनाला मागून जोरदार धडक दिल्याचे समजते.

देवदर्शनावरून परतताना काळाचा घाला

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील जोगेश्वरी परिसरात राहणारे जयस्वाल कुटुंब बुधवारी (१६ सप्टेंबर) नाशिकच्या प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शन घेऊन आपल्या कारने मुंबईकडे निघालं होतं. कार आटगाव शिवारात आली असता, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका मालवाहू ट्रकला कारने मागून जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती की, कारचा पुढचा भाग पूर्णपणे चुरडा झालाआणि वाहनातील प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. या अपघातात ४ जणांचा जागेवरच मृत्यू झाला.

स्थानिकांची धाव आणि मदतकार्य

अपघाताचा भीषण आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. कारमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी मोठे प्रयत्न केले. दुर्दैवाने, चार जणांचा जागीच दुर्दैवी अंत झाला होता, तर सहा जण गंभीररीत्या जखमी झाले होते. जखमींमध्ये चिमुकल्याचा समावेश आहे. अपघातातील सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी शहापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जोगेश्वरी परिसरात शोककळा

आनंदात देवदर्शन करून घरी परतताना अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे जायसवाल कुटुंबावर आणि जोगेश्वरी परिसरात शोककळा पसरली आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

घटनास्थळी दाखल झालेल्या शहापूर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. अपघातातील मृत आणि जखमींची अचूक ओळख पटवण्याचे काम पोलिस करत आहेत. हा अपघात नेमका चालकाला डुलकी आल्यामुळे घडला, अतिवेगामुळे झाला की वाहनात काही तांत्रिक बिघाड झाला होता, याचा सखोल तपास पोलिस करत आहेत.

आमच्याबद्दल माहिती
मंत्रालय टाईम्स हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींवर लक्ष केंद्रित करणारे एक डिजिटल न्यूज पोर्टल (वेब पोर्टल) आहे. स्वतःला भारताची पहिली विश्वसनीय माहिती देणारी राजकीय वृत्तसंस्था म्हणून ओळखणारे हे पोर्टल सुशासनाला (Good Governance) पाठिंबा देण्यासाठी आणि राजकीय उत्तरदायित्व वाढवण्यासाठी कार्यरत आहे. Read More
For Feedback - mantralaytimes5005@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

error: Content is protected !!
WhatsApp Icon Telegram Icon