मोठी ब्रेकिंग | मंत्रालयातील सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल : वीजपुरवठा खंडित, अधिकारी-कर्मचाऱ्यांना इमारत रिकामी करण्याच्या तातडीच्या सूचना.!

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

मंत्रालयात सध्या सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल राबवण्यात येत आहे. संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी तसेच मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्याच्या उद्देशाने ही मोहीम युद्धपातळीवर सुरू करण्यात आली आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून मंत्रालयाच्या प्रशासकीय इमारतीतील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. तसेच इमारतीमध्ये उपस्थित असलेल्या सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तातडीने इमारत रिकामी करण्याच्या सूचना सातत्याने दिल्या जात आहेत. यासाठी मंत्रालय परिसरात वारंवार सूचना देण्यात येत असून, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचे निर्देश दिले जात आहेत.

या संपूर्ण मॉक ड्रिलच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी आणि इतर उपस्थित व्यक्तींनी कशा प्रकारे प्रतिसाद द्यावा, याची चाचपणी केली जात आहे. तसेच सुरक्षा यंत्रणांची सज्जता, आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा आणि इमारत रिकामी करण्याच्या प्रक्रियेचा आढावा घेतला जात आहे.

मंत्रालयासारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय केंद्राच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही मॉक ड्रिल महत्त्वाची मानली जात आहे. कोणत्याही संभाव्य धोक्याच्या परिस्थितीत कमीत कमी वेळेत योग्य ती खबरदारी घेता यावी आणि जीवितहानी टाळता यावी, या उद्देशाने ही संपूर्ण मोहीम राबवली जात आहे.

आमच्याबद्दल माहिती
मंत्रालय टाईम्स हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींवर लक्ष केंद्रित करणारे एक डिजिटल न्यूज पोर्टल (वेब पोर्टल) आहे. स्वतःला भारताची पहिली विश्वसनीय माहिती देणारी राजकीय वृत्तसंस्था म्हणून ओळखणारे हे पोर्टल सुशासनाला (Good Governance) पाठिंबा देण्यासाठी आणि राजकीय उत्तरदायित्व वाढवण्यासाठी कार्यरत आहे. Read More
For Feedback - mantralaytimes5005@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

error: Content is protected !!
WhatsApp Icon Telegram Icon