अमित शहा-एकनाथ शिंदे यांच्यात तब्बल अर्धा तास चर्चा; एकत्र प्रवास.!

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या ‘सेवा संकल्प अभियाना’ची माहिती दिली. या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. मात्र, यानंतर समोर आलेल्या एका फोटोमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

#Mumbai मुंबई दौऱ्यादरम्यान अमित शहा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे, या बैठकीनंतर अमित शहा आणि एकनाथ शिंदे हे दोघेही एशियाटिक सोसायटीमधील एका कार्यक्रमासाठी एकाच कारमधून रवाना झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र थेट कार्यक्रमस्थळी पोहोचले.

शहा आणि शिंदे यांच्यात नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे या भेटीमागे नेमका कोणता राजकीय विषय होता, याबाबत तर्क-वितर्कांना सुरुवात झाली आहे. आगामी काळातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व दिलं जात आहे.

दरम्यान, केंद्रीय मंत्रिमंडळाच्या संभाव्य विस्ताराची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे दिल्ली दौरेही वाढल्याचं पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाची बैठक सोडून दिल्ली गाठली होती. त्यावेळी त्यांनी अमित शहा यांची भेट घेतली होती.

याच पार्श्वभूमीवर आता शहा-शिंदे यांची मुंबईतील भेट चर्चेचा विषय ठरली आहे. त्यातच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी अमित शहा यांना देशाचे उपपंतप्रधान व्हायचे असल्याचा दावा केला होता. मात्र, या दाव्याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

आमच्याबद्दल माहिती
मंत्रालय टाईम्स हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींवर लक्ष केंद्रित करणारे एक डिजिटल न्यूज पोर्टल (वेब पोर्टल) आहे. स्वतःला भारताची पहिली विश्वसनीय माहिती देणारी राजकीय वृत्तसंस्था म्हणून ओळखणारे हे पोर्टल सुशासनाला (Good Governance) पाठिंबा देण्यासाठी आणि राजकीय उत्तरदायित्व वाढवण्यासाठी कार्यरत आहे. Read More
For Feedback - mantralaytimes5005@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

error: Content is protected !!
WhatsApp Icon Telegram Icon