ब्रेकिंग | गोपीचंद पडळकरांनी गुलाल उधळला, मिरजेसह सांगलीत जोरदार जल्लोष..! सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विजय, किती मतं मिळाली?

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत ६ जागांची मतमोजणी प्रक्रिया मिरजेतील मार्केट यार्ड मध्ये सुरू आहे. आठ टेबल वर २५ कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मतमोजणी होत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १५ जागा बिनविरोध झाल्यानंतर उरलेल्या सहा जागांसाठी १३ उमेदवार मैदानात होते. जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांचा विजय झाल्याची माहिती समोर आली आहे. सांगली जिल्हा बँकेच्या मतमोजणी केंद्राच्या परिसरात आमदार गोपीचंद पडळकरयांच्या समर्थकांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यास सुरुवात झाली आहे.

गोपीचंद पडळकर यांच्या विजय घोषित करण्यापूर्वीच समर्थकांची जल्लोषाची जय्यत तयारी केली होती. मिरज मिशन चौकात जेसीबीने गुलाल उधळण्याची तयारी कार्यकर्त्यांनी केली आहे. डॉल्बीचा दणदणाट, क्रेनच्या सहाय्याने भव्य हार घालण्याची तयारी करण्यात आली आहे. जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी ४५ मतांचा कोटा पूर्ण केला. एकूण ८८ मता पैकी विजयासाठी ४५ मतांची आवश्यकता होती. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या विजयाची औपचारिकता बाकी होती. मतमोजणीच्या ठिकाणीच पडळकर समर्थकांकडून जल्लोष करण्यास सुरूवात झाली.

जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर ५४ मतांनी विजयी झाले आहेत. विरोधी उमेदवार विनोद पवार यांना ३४ मते पडली आहे. मतमोजणीच्या ठिकाणीच पडळकर समर्थकांकडून जल्लोषाला सुरुवात झाली आहे. जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर ५४ मते मिळाली, तर विरोधी उमेदवार विनोद पवार यांना ३४ मते मिळाली. एकूण २० मताने पडळकर विजयी झाले आहेत. मतमोजणीच्या ठिकाणीच पडळकर समर्थकांकडून विजय साजरा केला जात आहे.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जिल्हा बँकेच्या विजयानंतर पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. गोपीचंद पडळकर यांना अनेकांनी खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला, मात्र पडळकर यांनी विरोधकांनाच खिंडीत गाठलं,जत मधील अनेक नेत्यांनी पडळकर यांना मदत केल्यामुळे गोपीचंद पडळकर यांचा विजय झाला, त्याबद्दल त्यांचे आभार अशी प्रतिक्रिया ब्रह्मानंद पडळकर यांनी दिली आहे.

आमच्याबद्दल माहिती
मंत्रालय टाईम्स हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींवर लक्ष केंद्रित करणारे एक डिजिटल न्यूज पोर्टल (वेब पोर्टल) आहे. स्वतःला भारताची पहिली विश्वसनीय माहिती देणारी राजकीय वृत्तसंस्था म्हणून ओळखणारे हे पोर्टल सुशासनाला (Good Governance) पाठिंबा देण्यासाठी आणि राजकीय उत्तरदायित्व वाढवण्यासाठी कार्यरत आहे. Read More
For Feedback - mantralaytimes5005@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

error: Content is protected !!
WhatsApp Icon Telegram Icon