राज्यातील IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नवी जबाबदारी..!

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

 

  • खास प्रतिनिधी – मंत्रालय टाइम्स

राज्यातील सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांनाही (IAS) पदोन्नती देण्यात आली आहे. तसेच, पुणे, सातारा जिल्हाधिकारीही बदलण्यात आले आहेत.

राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव व्ही. राधा यांच्या आदेशाचे पत्र जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, मिलिंद म्हैसकर यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यभार देण्यात आला आहे. तर, वेणुगोपाल रेड्डी यांना उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि वन विभागाच्या अतिरिक्त सचिवपदी जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच, पुणे जिल्ह्याच्या जिल्हाधिकारीपदी (Collector) साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सातारा जिल्हाधिकारीपदी संतोष पाटील यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

राज्यातील 12 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये 2 महिला अधिकारी आहेत. तर, सातारा व पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी बदलण्यात आले आहेत. पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांना पदोन्नती देत भूमी अभिलेख विभागाच्या जमाबंदी आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर, पुणे झेडपीचे सीईओ संतोष पाटील यांना साताऱ्याचे जिल्हाधिकारी नियुक्ती दिली आहे. तसेच, साताऱ्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आता पुण्याचे जिल्हाधिकारी असणार आहेत.

  • १२ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कुणाला कुठे पदभार

1. मिलिंद म्हैसकर (IAS:RR:1992) अतिरिक्त मुख्य सचिव (1), सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वने), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

2. बी. वेणुगोपाल रेड्डी (IAS:RR:1994) अतिरिक्त मुख्य सचिव (वने), महसूल आणि वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांची अतिरिक्त मुख्य सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

3. विकास चंद्र रस्तोगी (IAS:RR:1995) प्रधान सचिव, उच्च आणि तंत्रशिक्षण विभाग., मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव (कृषी), कृषी आणि ADF विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्त करण्यात आले आहे.

4. आय. ए. कुंदन (IAS:RR:1996) प्रधान सचिव, शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांची प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

5. विनिता वैद सिंगल (IAS:RR:1996) प्रधान सचिव (कामगार), उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई यांना प्रधान सचिव, पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

6. डॉ.हर्षदीप कांबळे (IAS:RR:1997) यांना प्रधान सचिव, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

7. डॉ. निपुण विनायक (IAS:RR:2001) प्रकल्प संचालक, RUSA, उच्च तंत्रशिक्षण विभाग, मुंबई यांना सचिव (1), सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई नियुक्त करण्यात आले आहे.

8. जयश्री भोज (IAS:RR:2003) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ, मुंबई यांची सचिव, अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

9. डॉ. सुहास दिवसे (IAS:SCS:2009) जिल्हाधिकारी, पुणे यांची सेटलमेंट कमिशनर आणि संचालक, भूमी अभिलेख, पुणे म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

10. श्री.एच.एस.सोनवणे (IAS:SCS:2010) यांची नियुक्ती आयुक्त, क्रीडा आणि युवक, पुणे म्हणून करण्यात आली आहे.

11. श्री संतोष पाटील (IAS:SCS:2013) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांची जिल्हाधिकारी, सातारा म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

12. श्री जितेंद्र दुडी (IAS:RR:2016) जिल्हाधिकारी, सातारा यांची पुणे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

आमच्याबद्दल माहिती
मंत्रालय टाईम्स हे प्रामुख्याने महाराष्ट्रातील राजकीय आणि प्रशासकीय घडामोडींवर लक्ष केंद्रित करणारे एक डिजिटल न्यूज पोर्टल (वेब पोर्टल) आहे. स्वतःला भारताची पहिली विश्वसनीय माहिती देणारी राजकीय वृत्तसंस्था म्हणून ओळखणारे हे पोर्टल सुशासनाला (Good Governance) पाठिंबा देण्यासाठी आणि राजकीय उत्तरदायित्व वाढवण्यासाठी कार्यरत आहे. Read More
For Feedback - mantralaytimes5005@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

error: Content is protected !!
WhatsApp Icon Telegram Icon