सातारा

मोठी ब्रेकिंग | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थोडक्यात बचावले! हेलिकॉप्टरची इमर्जन्सी लँडिंग.. वाचा सविस्तर.

मंत्रालय टाइम्स – सातारा प्रतिनिधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं सातारा जिल्ह्यातील मूळ गाव दरे इथून हेलिकॉप्टरनं पुण्याकडं निघाले होते. पण खराब हवामानामुळं त्यांच्या हेलिकॉप्टरला इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं.

यावेळी त्यांच्यासोबत स्वीय सहाय्यक प्रभाकर काळे, मंगेश चिवटे, विशेष कार्यकारी अधिकारी कवळे हे हेलिकॉप्टरमध्ये उपस्थित होते. पण उड्डाणानंतर अचानक हवामान बदलल्यानं हेलिकॉप्टरचं दरे गावात इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.साम टीव्हीच्या सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.

नेमकं काय घडलं?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सहकाऱ्यांसोबत दरे गावातून पुण्याकडं रवाना झाले. परंतू अचानक ढगाळ वातावरण झालं अन् मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळं कोयना धरणाच्या बॅकवॉटरच्या अगदी पंधरा फुटांपर्यंत हेलिकॉप्टर खाली आले होतं. त्यामुळं आजूबाजूच्या कोणत्याही एखाद्या शेतात हेलिकॉप्टर लँड करावं का? याबाबत पायलट विचार करत होता.

पण तशी सोयीची जागा आजूबाजूला नसल्यानं हे हेलिकॉप्टर पुन्हा एकदा माघारी दरे या गावाच्या दिशेनं निघालं. टेकऑफ घेतला होता त्याच ठिकाणी ते पुन्हा लँड झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे रस्ता मार्गानं पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

पण अचानक घडलेल्या या प्रकारामुळं बाका प्रसंग निर्माण होऊ शकला असता पण पायलटनं योग्य वेळी इमर्जन्सी लँडिंगचा निर्णय घेतल्यानं पुढील संभाव्य धोका टळला आणि मुख्यमंत्र्यांसह त्यांचे सर्व सहकारी सुखरुप पुढे रवाना झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!