ब्रेकिंग | मंत्रालय हादरले..! नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून मारल्या उड्या; भयंकर प्रकाराने सर्वत्र खळबळ.

WhatsApp
Telegram
Facebook
Twitter
LinkedIn

मंत्रालय टाइम्स – (खास प्रतिनिधी) आदीवासी आरक्षणात इतर कोणत्याही जातीच्या समावेश करू नये अशी मागणी करत विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांच्यासह अनेक आदिवासी आमदारांनी मंत्रालयातून जाळीवर उड्या मारल्या आहेत. त्यामुळे मंत्रालयात मोठा गोंधळ उडाला होता.

राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू होत्या. अशात राज्यातील सर्वपक्षीय आमदारांनी धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्यास विरोध केला आहे.

दोन दिवसांपूर्वी हे सर्वपक्षीय आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले होते. अनेक तास वाट पाहिल्यानंतरही मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांची भेट घेतली नसल्याने हे सर्व आमदार संतापले होते.

दरम्यान या सर्व आमदारांना जाळीतून बाहेर काढण्यात आले आहे. यावेळी नरहरी झिरवळ यांचा रक्तबाद वाढल होता. अशा अवस्थेतही झिरवळ आणि सर्व आदिवासी आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी आग्रही आहेत.

मंत्रालयात अनेक आदिवासी आमदार दुसऱ्या मजल्यावरील सुरक्षा कठड्यावर उतरून घोषणा देत होते. धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देऊ नये अशी मागणी आंदोलक आमदारांनी केली आहे.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर मंत्रालयातील पोलिसांनी धाव घेत आंदोलनकर्त्या आमदारांना जाळीतून बाहेर काढले. उड्या मारलेल्या आमदारांपैकी कोणीही जखमी झालेले नाही. मात्र यानंतर नरहरी झिरवळ यांचा रक्तदाब वाढल्याचे पाहायला मिळाले.

दरम्यान मंत्रालयात यापूर्वी अनेक सर्वसामान्य नागरिकांनी कामे होत नसल्याने वैतागून उड्या मारल्याचे पाहायला मिळाले होते. पण आता आमदारही असेच प्रकार करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

डॉ. संकेतराज बने मुख्य संपादक  के बारे में
For Feedback - mantralaytimes@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

error: Content is protected !!
WhatsApp Icon Telegram Icon