कोकण विभाग
सुरेश खाडे यांच्यासह मुनगंटीवारांना मिळणार विशेष जबाबदारी
राज्याचे माजी कामगार मंत्री सुरेश खाडे व ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची चांगलीच चर्चा रंगली आहे. पक्षाकडून सांगण्यात येत आहे की, दोन्हीही आमचे ज्येष्ठ नेते आहेत. काही जणांचा मंत्रिमंडळात समावेश न केल्यामुळे त्यांना विशेष जबाबदारी देण्याचा पक्षाचा मानस आहे. आम्हाला पक्ष आणि सरकार दोघांनाही चालवावे लागते. आमच्या केंद्रीय नेतृत्वाने काही विचार करूनच हा निर्णय घेतला असेल. लवकरच त्यांच्याबाबत चांगला निर्णय घेतला जाईल.असे ‘मंत्रालय टाइम्स’शी संवाद साधताना भाजपा पक्षाकडून सांगण्यात आले.