नागपूर विभाग

जातीय दंगलींपेक्षा रस्ते अपघातात जास्त लोकांचा जीव जातोय, केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी म्हणाले…!

मंत्रालय टाइम्स – मुंबई | सध्या राज्यातील हिट अँड रन प्रकरणांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. काही दिवसापूर्वी मुंबईतील वरळीचे हिट अँड रनचे प्रकरण ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर दुसरीकडे पुण्यात एका अल्पवयीन मुलाने दोन तरुणांना उडवल्याची घटना घडली होती.

देशातील वाढत्या हिट अँड रन प्रकरणांबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्टच मत मांडले आहे. ज्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. ते म्हणाले, जे पालक आपल्या मुलांना लहान वयात गाडी चालविण्याची परवानगी देतात त्या पालकांचे नाव जगजाहीर केले पाहीजे. अशाप्रकारे गडकरींनी पुणे आणि मुंबईतील हिट अँड रन प्रकरणावरून महाराष्ट्र सरकारवर देखील टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे. राज्य सरकार आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोप देखील यावेळी त्यांनी केला आहे. तसेच जातीय दंगलींपेक्षा दरवर्षी रस्ते अपघातात जास्त लोकांचा जीव जातो, असे त्यांनी स्पष्ट म्हटले आहे.

ते म्हणाले, वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना दंड वाढवून देखील ते नियमाचे पालन करत नाही. त्यांना असे करताना काहीच भिती वाटत नाही. तसेच त्यांनी अभियंत्यांना राष्ट्रीय महामार्गांदरम्यान दुभाजकांचे नवीन डिझाइन तयार करण्यास सांगितले आहे,. जे कोणीही ओलांडू शकणार नाही. अशाप्रकारे नियम मोडणाऱ्यांना रोखण्यासाठीही अशी पावले उचलावी लागणार, असल्याचे ते म्हणाले आहेत. तसेच रस्ते वाहतूक विभागाने शहरी भागातून जाणाऱ्या महामार्गांवर रॅम्पसह आणखी फूटओव्हर ब्रिज बांधण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे. जेणेकरून दुचाकीस्वार त्यांचा वापर करू शकतील आणि अपघातांना आळा बसेल.

पुण्यात एका अल्पवयीन मुलाने आपल्या वडिलांच्या कारने दोन तरुणांना उडवल्याची घटना घडली आहे. ज्यामुळे त्या दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र त्या आरोपीच्या कुंटुंबाने पैशाच्या जोरावर सर्व पुरावे नष्ट करण्याचा कसा प्रयत्न केला हे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणात पोलिसांवर दबाव आणल्याची बाबही समोर आली आहे. तर दुसरीकडे मुंबईत एका व्यक्तीने एका महिलेला आपल्या कारने चिरडून ठार केल्याची घटना देखील घडली आहे. या प्रकरणात देखील राजकीय दबावापोटी पोलिसांनी आरोपीसाठी वेळकाढूपणा केल्याचे समोर आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!