भाजपची मंत्रिमंडळाची संभाव्य यादी समोर; ‘या’ नव्या चेहऱ्यांच्या नावावर शिक्कामोर्तब ? ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट ?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra fadnavis) यांच्या सरकारचा मंत्रिमंडळ (ministry) विस्तार 15 किंवा 16 डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदासाठी संधी मिळणार आहे.त्यामुळेच भाजपच्या नेत्यांची संभाव्य यादी (ministers list) समोर आली आहे.
भाजपच्या संभाव्य यादी नुसार अनेक नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचा स्पष्ट होत आहे. तर दुसरीकडे पक्षातील बड्या नेत्यांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप मंत्रिमंडळ विस्तारात नेहमीप्रमाणे धक्कातंत्राचा अवलंब करणार असल्याचं बोललं जात आहे.
भाजपची संभाव्य यादी
भाजपच्या वाट्याला जवळपास 20 ते 22 मंत्रिपदं येण्याची शक्यता आहे. त्यातील पहिला टप्प्यात 15 ते 16 मंत्री शपथ घेऊ शकतात. नव्या चेहऱ्यांमध्ये राहुल अहीर, राहुल कुल, सचिन कल्याणशेट्टी, नितेश राणे, चंद्रशेखर बावनकुळे, समीर कुनवार, रवी राणा यांना संधी देण्यात येणार आहे. संजय कुटे, आशीष शेलार, योगेश सागर, राधाकृष्ण विखे पाटील, रविंद्र चव्हाण, अतुल सावे यांनी त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे.
महिलांनाही संधी
मंत्रिपदाच्या शर्यतीत यंदा अनेक महिलांची नावं चर्चेत आहेत. ज्यामध्ये पहिलं नाव हे अर्थातच पंकजा मुंडे यांचं आहे. त्यासह सलग चार टर्म आमदार राहिलेल्या माधुरी मिसाळ यांना देखील मंत्रिपद मिळू शकतं.
ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट ?
एकीकडे नव्या चेहऱ्यांना संधी द्यायच्या विचारात असलेल्या भाजपने अनेक ज्येष्ठ नेत्यांचा पत्ता कट केला आहे, अशी चर्चा सुरू आहे. त्यानुसार माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीष महाजन आणि चंद्रकांत पाटील, सुरेश खाडे यांना पुन्हा मंत्रीपद मिळण्याची शक्यता कमी आहे. त्याऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यासाठी भाजप आग्रही असल्याचं सांगितलं जात आहे.