मोठी ब्रेकिंग | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेत पोलिसांचा लाठीमार.!
मंत्रालय टाइम्स – नाशिक | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिकच्या नांदगावमधील कार्यक्रमस्थळी मोठी गर्दी झाली होती. यावेळी नागरिकांनी एकनाथ शिंदे फुलांचा वर्षाव केला आणि एकच गोंधळ घातला. त्यामुळे पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.
यावेळी पोलिसांचा मार चुकवताना काही जण खाली पडले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बघण्यासाठी मोठी गर्दी झाली होती, मात्र पोलिसांच्या ढिसाळ नियोजनाचा नागरिकांना मार खावा लागला आहे.
सभास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या नांदगावमध्ये आज सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार होती. मुख्यमंत्री येणार असल्याने या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येताच नागरिकांनी त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला आणि हुल्लडबाजीही सुरू केली.
त्यामुळे कार्यक्रमस्थळावर एकच गोंधळ माजला. अडथळे पाऱ करून नागरिक कार्यक्रमस्थळावर पोहोचले होते. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ शांत करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावेळी काही जण खाली पडले. काही वेळानंतर गर्दी शांत झाली.