मुंबई शहर

ब्रेकिंग | फडणवीस यांचा एकनाथ शिंदेंना धक्का:मंगेश चिवटे यांची मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी काढली, नवे प्रमुख रामेश्वर नाईक

 

  • मुंबई – खास प्रतिनिधी

मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुखपदावरुन मंगेश चिवटे यांना हटवण्यात आले आहे. एकनाथ शिंदे यांचे विश्वासू म्हणून त्यांची ओळख असल्याने एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीस यांनी मोठा झटका दिल्याची चर्चा आहे.

दरम्यान मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाच्या प्रमुखपदी रामेश्वर नाईक यांच्या नियुक्तीचे पत्र जारी करण्यात आले आहे. रामेश्वर नाईक यांच्याकडे यापूर्वी उपमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी होती. धर्मादाय रुग्णालयात गरीब रुग्णांना मदत मिळवून देण्यात रामेश्वर नाईक यांचे मोठे योगदान आहे. जरांगेंशीही चिवटेंकडून अनेकदा चर्चा मंगेश चिवटे हे पूर्वाश्रमीचे पत्रकार आहेत. त्यांनी मुंबईत अनेक वृत्तवाहिन्यांसाठी वार्ताहार म्हणून काम केलं आहे. तसंच काही काळ चिवटे यांनी दिल्लीतही पत्रकारिता केली आहे.

पत्रकार म्हणून काम करत असतानाच मंगेश चिवटे यांनी गोरगरीब रुग्णांसाठी काम करण्यास सुरुवात केली होती. या कामाला शासकीय यंत्रणेची ताकद मिळावी, या हेतूने चिवटे यांनी 2015 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाची संकल्पना मांडली. मंगेश चिवटे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे काही महिन्यांनंतर ही संकल्पना पूर्णत्वास आली आणि या कक्षाच्या माध्यमातून राज्यभरातील लाखो गरीब आणि अडल्या-नडलेल्या रुग्णांना आर्थिक मदत मिळू लागली. कोरोनाच्या काळात मंगेश चिवटे यांनी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडली होती. त्यावेळी त्यांनी असंख्य गरजूंना मदत केली होती. कोरोनातील कामगिरीमुळे त्यांना आरोग्यदुत म्हणत होते. त्यांची ही धडपड, तळमळ, प्रामाणिकपणा आणि संवादाची शैली पाहूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्यावर विश्वास टाकला. मनोज जरांगे यांच्या तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाच्यावेळी जरांगे यांच्याशी संवाद साधणाऱ्या शिष्टमंडळात मंगेश चिवटे यांचा समावेश केला.

मनोज जरांगेंशी संवाद साधणाऱ्या शिष्टमंडळातील चेहरे प्रत्येकवेळी बदलले, पण मंगेश चिवटे कायम शिष्टमंडळात राहिले. फडणवीसांच्या पहिल्या टर्ममध्ये नाईकांवर जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्या काळात या कक्षाला महत्त्व आले होते. गिरीश महाजन आणि रामेश्वर नाईक यांनी मुख्यमंत्री साहायता निधीच्या माध्यमातून रुग्णसेवा कक्षाचे काम प्रभावीपणे केले होते. देवेंद्र फडणवीसांच्या पहिल्या टर्ममध्ये रामेश्वर नाईक यांच्याकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधी विभागाची जबाबदारी होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!