‘या’ पाटलांचा चेंडू फडणवीसांच्या कोर्टात..?
मंत्रालय टाइम्स – मुंबई | ‘लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार स्वतः म्हणाले की देवेंद्र फडणवीस इंदापूर तालुक्याविषयी जो निर्णय घेतील तो मान्य असेल. देवेंद्र फडणवीस ही मला म्हणाले त्यासंदर्भातला निर्णय घेईल त्यामुळे देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात, मी वाट पाहत आहे. तीन आठवड्यापूर्वी याविषयी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे चर्चा झाली ते म्हणाले निर्णय घेऊ. आम्ही कायमच लोकांच्या मध्ये असतो आम्हाला तयारीची गरज नाही. देवेंद्र फडणवीस या संदर्भात काय भूमिका घेतात हे बघू. ते योग्य निर्णय घेतील’, असं म्हणत इंदापूर विधानसभेचा चेंडू हर्षवर्धन पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात टाकला.
हर्षवर्धन पाटील आजवर इंदापुरात चारवेळा आमदार म्हणून जिंकलेत पण 2014 पासून अजितदादांचे पट्टशिष्य दत्तामामा भरणे काही केल्या त्यांना जमू देईनात. अगदी गेल्यावेळी पाटलांनी कमळही हाती घेऊन पाहिलं, पण राजकीय गणित काही जुळत नाही, म्हणूनच यंदा इंदापूरचा गड पुन्हा काबिज करण्यासाठी हर्षवर्धन पाटलांनी पवारांची तुतारी हाती घेतल्यास अजिबात आश्चर्य वाटायला नको.