ब्रेकिंग | मंत्रालयात चर्चेला उधाण : सुजाता सौनिकांचे मुख्य सचिवपद धोक्यात.? चहल यांच्यासाठी वेगळी सेटिंग..!
मंत्रालय टाइम्स – मुंबई | राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव म्हणून मान मिळविणाऱ्या सुजाता सौनिक यांना हटविण्याच्या हालचाली मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावर सुरू असल्याचे समजते. गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबालसिंह चहल हट्ट पुरविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘मित्रा’ने पुढाकार घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी ‘मंत्रालय टाइम्स ‘ला दिली.
आयएएस अधिकारी सुजाता सौनिक यांनी 30 जून 2024 रोजी मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडून मुख्य सचिवपदाचा कार्यभार स्वीकारला. हा बहुमान पटकावणाऱ्या सुजाता सौनिक या राज्यातील पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. यापूर्वी गृहसचिव या पदावर असलेल्या चंद्रा अय्यंगार, चित्कला झुत्शी, मेधा गाडगीळ या तिघीही सेवाज्येष्ठतेनुसार मुख्य सचिव पदाच्या दावेदार होत्या. पण त्यांना संधी मिळू शकली नाही. मात्र, आता सुजाता सौनिक यांची या पदावरून उचलबांगडी करण्याचा विचार सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
गृह विभागाचे अप्पर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल हे मुख्यमंत्री शिंदे यांचे अत्यंत विश्वासू समजले जातात. मुंबई महानगरपालिका आयुक्तपदावर तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेल्या इकबालसिंह चहल यांची लोकसभा निवडणुकांपूर्वी बदली करावी, असे पत्र निवडणूक आयोगाने राज्य सरकारने त्याची दखल घेतली नव्हती. त्यामुळे स्वत: निवडणूक आयोगाने त्यांना त्या पदावरून हटविले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.