कोकण विभागपुणेमुंबई शहर

मोठी ब्रेकिंग | ‘मिशन १२५’.? विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली, ‘अशी’ ठरली रणनिती..!

Mantralay Times - येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीप्रमाणेच फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. यातील १२५ जागांचं मिशन भाजपने विधानसभेत ठेवलं आहे. यातील जवळपास ५० जागांवर निश्चित विजय होईल, असा विश्वास भाजपला आहे.

Maharashtra Assembly election 2024 : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. सर्वच पक्षांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. सध्या सर्वच पक्षांकडून विविध मतदारसंघांची चाचपणी केली जात आहे. त्यातच आता भाजप १२५ जागांवर विधानसभा निवडणूक लढणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यातील २५ जागांवर भाजपचा विजय निश्चित असल्याचे बोललं जात आहे.

  • निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकीत निर्णय..

विधानसभा निवडणुकांची घोषणा होण्यापूर्वी भाजपच्या निवडणूक व्यवस्थापन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मुंबईत ही बैठक पार पडली. या बैठकीत भाजप किती जागांवर निवडणूक लढवणार, याबद्दल चर्चा करण्यात आली. तसेच भाजपचा कोणत्या जागांवर निश्चित विजय होईल, याबद्दलही चर्चा करण्यात आली.

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकीप्रमाणेच फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे. यातील १२५ जागांचं मिशन भाजपने विधानसभेत ठेवलं आहे. यातील जवळपास ५० जागांवर निश्चित विजय होईल, असा विश्वास भाजपला आहे. तर उरलेल्या ७५ जागांवर निवडून येण्यासाठी भाजपकडून शर्थीचे प्रयत्न केले जाणार आहेत, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

जिल्ह्यातील प्रमुख नेत्यावर त्या मतदारसंघाची जबाबदारी..!

या उरलेल्या ७५ जागांसाठी भाजपकडून वेगळी रणनिती ठरवण्यात आली आहे. या ७५ जागा ज्या कोणत्या जिल्ह्यात असतील, त्या जिल्ह्यातील प्रमुख नेत्यावर त्या मतदारसंघाची जबाबदारी दिली जाणार आहे. हा अहवाल राज्यातील भाजप वरिष्ठांना आणि केंद्रातील वरिष्ठांना दिला जाणार आहे. तसेच यात जे काही मतदारसंघ असतील, त्या मतदारसंघात तो नेता ग्राऊंड लेव्हला काम करणार आहे. सामान्य मतदारांपासून भाजपच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत एकत्र बांधणी करायची आहे. ७५ जागांसाठी वेगळी रणनिती आखण्यास सुरुवात तसेच त्या मतदारसंघात जमेची बाजू कोणती, काय कमतरता आहे, याचीही चर्चा करायची आहे. त्यानंतर हा देखील अहवाल राज्यातील भाजप वरिष्ठांना दिला जाणार आहे, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे भाजपने उर्वरित ७५ जागांसाठी वेगळी रणनिती आखण्यास सुरुवात केल्याचे पाहायला मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!